"एकदा Gappu आणि pappu एका जेवण्याच्या पंगतीत
जेवत असतात
तेव्हा त्यांना एक माणूस येऊन विचारतो... ""तुम्ही कोण?""
Gappu - ""मी मुला कडून आलोय..""
Pappu - ""मी मुलीकडून आलोय..""
. .
.
.
.
.
. .
. .
विचारपूस करणारा माणूस - "" चपलेने मारीन माकडांनो; हे तेराव्याचे जेवण आहे..."
##############
"पप्पू आणि आणि गोलू गंभीर चेहरे करुन
बोलत होते...
पप्पू- माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे
गेल्या आठवड्यात भांडण झाले
आणि आम्ही दोघांनी वेगळे
होण्याचा निर्णय घेतला...
गोलू - मग ....?
पप्पू - तिने
मला चिडविण्यासाठी एका नविन
बॉयफ्रेंडसोबत
फोटो काढला आणि तो मला पाठवला...
गोलू - अरे... हे फार वाईट झाले... जाऊ
दे, बॅडलक म्हणून सोडून दे...
पप्पू - सोडून दे ! तेच तर केले...
मला फोटो पाठवते काय,
मीही काही कमी नाही.
मीही तो फोटो उचलला आणि तिच्या बापाकडे
दिला पाठवून.."
##############
"पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..
शिक्षक :- का रे पप्पू .......पेपर मधल
काही येत नाही का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पू - तसं नाही सर...... मला उद्याच्या पेपर
चा अभ्यास करायचा आहे.... म्हणून लवकर
चाललोय....."
##############
"पप्पू आणि पप्पा : Father and Son Funny jokes in marathi
पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??
.
पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात ...
.
पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून
.
पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर ...
पप्पू: प . पण का पप्पा ....???
.
पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये"
##############
"पप्पू : एक 'मैनफोर्स' दया..
केमिस्ट : तु चव्हानांचा ना रे..??
पप्पू : अंकल 'मेन्टोस' बोललो 'मेन्टोस', एक दोन विक्स पण द्या गळा ख़राब आहे. गोळीच नाव पण निट घेता येत नाही.."
##############
"पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..
शिक्षक :- का रे पप्पू .......पेपर मधल
काही येत नाही का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पू - तसं नाही सर...... मला उद्याच्या पेपर
चा अभ्यास करायचा आहे.... म्हणून लवकर
चाललोय....."
##############
"पप्पू ने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या
मुलीनं त्याला नकार दिला…!!..मग काय
पप्पू ने ऑटोरिक्षा घेतली आणि तिच्या कॉलनी
मध्ये रिक्षा चालवू लागला, आता ती रोज
पप्पू ला थांबवते,
आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो
याला म्हणतात बदला घेणे….."
##############
"पप्पू आणि पप्पा : पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??
पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात …
पप्पू: मग आपली कामवाली..."
##############
"वडिल : पप्पू, रेल्वे येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात?
पप्पू : रेल्वे रुळ सोडून रस्त्यावर धावू नये म्हणून."
##############
"पप्पू : मम्मी आपल्या शेजारच्या मावशीची दोन-दोन नावं आहेत काय?
मम्मी : नाही बेटा त्यांचं नाव जया आहे.
पप्पू- पण डॅडी तर त्यांना डार्लिग म्हणत होते."
##############
"पाहुणा- मला तुमच्या घरातील माशा फार त्रास देताहेत. मी आलो तेव्हापासून त्या माझ्या अंगावर बसताहेत.
पप्पू- काका, मी पण त्यांच्या या सवयीने अगदी त्रासलोय. कुठे एखादी घाणेरडी वस्तू पाहिली की लगेच त्या बसतात."
##############
"पप्पू- हा बकरा इतका का ओरङतो आहे. खाटीक त्याला मारणार म्हणून ?
पप्पू- छे. एवढ्या छुल्लक कारणावरून? मला तर वाटतं, तो खाटिक त्याला शाळेत नेतोय असं वाटलं की काय त्याला?"
##############
"शिक्षिका : पप्पू तू एवढा चिंतेमध्ये का आहेस?
पप्पू ने उत्तर दिले नाही.
शिक्षिका : काय झाले, तू पेन विसरलास का?
पप्पू पुन्हा गपचूप
शिक्षिका : तू रोल नंबर विसरलास का?
पप्पू पुन्हा गपचूप
शिक्षिकेने पुन्हा विचारले : काय झाले आहे, काही तरी सांग काय विसरला आहेस.
पप्पू रागाने म्हणाला : अरे गप्प रहा माझी आई, येथे मी चुकीची चिठ्ठी घेऊन आलो आहे आणि तुला पेन-पेन्सिल आणि रोल नंबरचे पडून राहीले."
##############
"पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..
शिक्षक :- का रे पप्पू .......पेपर मधल
काही येत नाही का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पू - तसं नाही सर...... मला उद्याच्या पेपर
चा अभ्यास करायचा आहे.... म्हणून लवकर
चाललोय....."
##############
"पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??
.
पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात ...
.
पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून
.
पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर ...
पप्पू: प . पण का पप्पा ....???
.
पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये"
##############
"देव :- काय पाहिजे?
पप्पू :- पैशांनी भरलेली बग, नोकरी आणि एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव :- तथास्तु !!!"
##############
"वडिलांनी पप्पूला रागे भरत म्हटले, की इतक्या लहान वयात तू कार घेऊन काय करणार आहेस? ईश्वराने तुला दोन पाय कशासाठी दिले आहेत.
पप्पू- एक पाय एक्सलेटरसाठी व दुसरा ब्रेक लावण्यासाठी."
##############
"शेजारील स्त्री (पप्पूला)-- 'हा बाँल तूझा आहे काय?'
पप्पू -- 'या बाँलने काच फुटला आहे काय?'
शेजारी --'नाही.'
पप्पू-- 'मग माझा आहे.'"
##############
"पप्पू रस्त्यावर मुतत होता.
1 मुलगी तिथून जाताना थांबली.
तिला पाहून पप्पू म्हणाला ""जा तुम्ही,
तुम्ही ज्याला बघून घाबरत आहात
त्याला मी पकडून ठेवले आहे..!"
##############
"गंपू :- यार , मला माझ्या गल्फ्रेन्डला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचय.
पप्पू :- अरे , मग सोन्याची एक नाजूक अंगठी दे तिला.
गंपू :- तसं नाही रे…… भलमोठ वाटेल असं काहीतरी सुचव.
पप्पू :- मग असं कर …..ट्रकचा एक टायरच दे तिला."
##############
"याला म्हणतात बदला घेणे..!!
.
.
.
.
पप्पू ने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या मुलीनं त्याला नकार दिला...!!
.
.
मग काय;
.
.
पप्पू ने ऑटोरिक्षा घेतला आणि तिच्या कॉलनी मध्ये रिक्षा चालवूलागला,
.
आता ती रोज पप्पू ला थांबवते, आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो"
##############
"पप्या...
सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो...
.
तर त्याचे वडील त्याला विचारतात ..."" काय रे बाळा काय झालं ?""
.
पप्या काहीच बोलत नाही..
.
त्याचे वडील परत विचारतात ..""
अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे सांग ना. ""
.
पप्या म्हणतो,
"" अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!""
पप्याचे बाबा बेशुद्ध !!-"
##############
"पप्पु एकदा एका मुलीला I love you म्हणतो,
ती त्याच्या कानाखाली अवाज काढून विचारते, काय म्हणालास तु
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पु (रडत रडत) - जर ऎकलच नाही तर मारल कशाला.......?"
##############
"पप्पू - प्रिये, माझं हृदय म्हणजे मोबाइल फोन आणि तू म्हणजे सिमकार्ड आहेस. पप्पूची
गर्लफ्रेंड - ते ठिक आहे; पण तुझा मोबाइल ड्युअल सिम तर नाही ना?"
##############
चिंटू कधी चालू होणार आहे. चिंटू लवकरात लवकर सुरु व्हावे हि अपेक्षा. चिंटू,पप्पू,बगळ्या,मिनी,राजू. या सर्वांची पेपर वाचताना आठवण येते.
##############
"सतीश दादा :पप्पू आज एकटाच !
पप्पू :चिंटू मला जोशिबागेत येऊ नको म्हणाला .फक्त सोनुला घेऊन गेला .मलापण जायचं होत .
सतीश दादा तो आता काय करत असेल?
सतीश दादा:बहुतेक वेगवेगळ्या प्रकारच्या कैर्या खात असेल !
पप्पू:मी आता काय करू?मिनिबरोबर बसून कविता लिहू?"
##############
"पप्पू आणि आणि गोलू गंभीर चेहरे करुन बोलत होते...
पप्पू- माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे गेल्या आठवड्यात भांडण झाले आणि आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला...
गोलू - मग ....?
पप्पू - तिने मला चिडविण्यासाठी एका नविन बॉयफ्रेंडसोबत फोटो काढला आणि तो मला पाठवला...
गोलू - अरे... हे फार वाईट झाले... जाऊ दे, बॅडलक म्हणून सोडून दे...
पप्पू - सोडून दे ! तेच तर केले... मला फोटो पाठवते काय, मीही काही कमी नाही. मीही तो फोटो उचलला आणि तिच्या बापाकडे दिला पाठवून.."
##############
"पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..?? .
पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात ... .
पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून .
पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर ...
पप्पू: प . पण का पप्पा ....??? .
पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये"
##############
"पप्पू आणि शिक्षक ..................... पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..
शिक्षक :- का रे पप्पू .......पेपर मधल काही येत नाही का? . . . . . . . . . . .
पप्पू - तसं नाही सर...... मला उद्याच्या पेपर चा अभ्यास करायचा आहे.... म्हणून लवकर चाललोय....."
##############
"इलेक्ट्रोनिक शिकत असलेल्या पप्पू जोशी ला
शिक्षक विचारतात..
"" सांग रे जोश्या.....नाडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात...""
.
....
.
बिचारा जोश्या विचार करून म्हणतो.."" P h D ""
.
.
शिक्षक म्हणतात.."" म्हणजे काय रे "".
.
.
जोश्या लगेच तोंड वर करून सांगतो .. "" पायजमा Holding Device """
##############
"एक म्हातारी बाई रोज बस ने देवळात जायची.
ती ज्या बस ने जायची त्या बस कंडक्टरला रोज
बदाम काजू
खायला द्यायची.
एक दिवशी कंडक्टरने म्हाताऱ्या बाई
ला विचारले,""कि आजी मला रोज
काजू बदाम खायला का देते..?
म्हातारी बाई
म्हटली,""बेटा आता मी म्हातारी झाली आहे,
आणि त्यामुळे दात पण पडलेत, काजू बदाम
नुसते चघळून फेकून देन चांगल नाही ना.."
##############
"झंम्प्या : साहेब
ह्यावेळी तुम्ही माझा पगारात २०० रुपये कमी दिलेत
साहेब : अरे वा गेल्यावेळी तुला पगारात चुकून २०० रुपये जास्त दिले होते..
झंम्प्या : हो साहेब पण ती तुमची पहिलीच
चुक होती म्हणून मी तेव्हा गप्प होतो...."
##############
"दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेट वेडे असतात..
एक मित्र मरत
असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो ...
तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव..
काही दिवसांनी मेलेला मित्र
दुसर्याच्या स्वप्नात
... ... ... ... आला आणि म्हणाला ...एक
चांगली बातमी आहे आणि एक
वाईट ...
कोणती आधी सांगू...दुसरा मित्र
म्हणाला चांगली आधी ...
मेलेला मित्र म्हणाला ..
आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट आहे...
वाईट बातमी म्हणजे ...
बुधवारच्या म्याच मध्ये तुला बोलिंग
करायची आहे........."
##############
"एक माणूस घरी जातो आणि बायकोला म्हणतो ये लवकर जेवायला वाढ माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत.!
लगेच त्याची बायको त्याच्या पोटाला हात लावते ..... नवरा : हे काय केलस ? . . . . . . . . बायको : काकस्पर्श...."
##############
"बस गच्च भरली होती. आता ती सुरु होणार तोच ड्रायव्हरम्हणाला,“गाडीचाटायर पंक्चर आहे.....”
ताबडतोब कंडक्टर उतरला.....त्याच्या मागोमाग गण्या उतरला...
दोघांनी मिळून गाडीचा टायर बदलला....
बस सुरुहोण्यासाठी सज्ज झाली.
कंडक्टर गण्याला म्हणाला, “मी तुम्ही केलेल्या मदती बद्दली तुमचा आभारी आहे. आजकाल लोक एस.टी.वाल्यांना अजिबात मदत करीत नाहीत, पण साहेब तुम्ही स्वतः गाडीखाली जाऊन टायर चढवला. हातपाय , कपडे खराब करून घेतलेत. मी खरच खूप आभारी आहे.
तेवढ्यात गण्या म्हणाला, ” मित्रा, आभार मानण्याचे काहीच कारण नाही..... माझी बायको १० वर्षा नंतर माहेरी जातेय, ती याच बस मध्ये आहे...
टायर पंक्चर झाल्या मुळे माहेरी जाण तीचरद्द होऊ नये म्हणून केली हि सगळी खटपट...."
##############
"रम्या : बघ,
ती मुलगी माझ्याकडे बघून हसली
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या : साहजिकच आहे.
मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो"
##############
"मुलगी - चल एखादा गेम खेळूया..
मुलगा - चालेल...पण लपंडाव सोडून...
मुलगी - का रे?
मुलगा - कारण तुझ्यासारखी मुलगी शोधून
सापडणार नाही"
##############
"एकदा गण्या आणी रम्या दोघे रस्त्याने फिरत असताना त्यांना एक हजार रुपयाची नोट सापडली.
रम्या : चल गण्या, आपणफिफ्टी-फिफ्टी वाटुन घेऊया.
.
.
.
.
.
गण्या : मग बाकीच्या 900 रुपयांचे काय करायचे?"
##############
"ऐक आंधळा माणूस पोलिस मध्ये
भरती होण्यासाठी जातो
पोलिस म्हणतात
तुझा आम्हाला काय उपयोग
आंधळा सांगतो .......... .......... .......... .
: ... : :
:
:
:
:
: : :
:
:
उपयोग आहे ना
अंधाधुंद फायरिंग साठी .."
##############
"मुलगी:- असा काय बघतोयस माझ्याकडे,
तुला बहिण वगेरे नाही का ?
मुलगा ; आहे ना ,म्हून तर बघतोय..
मुलगी :- का ??
मुलगा :-कारण ती म्हणते, गोरी गोरी
पण फुलासारखी छान,दादा मला एक
वाहिनी आण.."
##############
"एकदा गण्या आणी रम्या रात्रीचे फिरत होते..
.
.
.
रम्या : अरे गण्या किती वाजले असतील रे.?
.
.
.
गण्या एक दगड उचलतो आणि समोरच्या घरात मारतो...
.
.
त्या घरातून एक बाई बाहेर आली आणि बोलली.
""अरे नालायकांनो,
आता तरी झोपा जा.
रात्रीचे 12.15 वाजलेत समजत नाही का.?"
##############
"hatavar basli mashi ti mi jhatakli..
Wa..wa..wa..
Hatavar basli mashi ti mi jhatakli.
Ani parat ali mashi, Ata Mazi Satakli.!!!"
##############
"Gandhiji chalayche kathila dharun dharun
.
.
Gandhiji chalayche kathila dharun dharun..
.
.
.
.
Aai shappath,Jiv challay Engineering cha abhyas karun karun ."
##############
"मुंबईतला किस्सा ...मंगळवारची सकाळ ..पप्प्या taxi वाल्याला विचारतो..
सिद्धीविनायाकला जाणार का ? ..ड्रायवर : हो जाणार कि ........पप्या म्हणतो .......
"" मग ठीक आहे ...जावा पण परत येताना माझ्या साठी प्रसाद घेऊन या """
##############
"फोन उचलत का नव्हतास तू ?
मुलगी : अरे मगाशी मी किती फोन करत होते ..उचलत का नव्हतास तू ?? : : : : मुलगा : काही नाही ग जरा रिंगटोन वर नाचत होतो .."
##############
"एका मुलाचं नाव GOPAL असतं.
एका मुलाचं नाव GOPAL असतं. . . . सगळे त्याला “OPAL OPAL” म्हणतात.. G कुठे गेला ? . . . G कैलाश खेर ने घेतला… . . कसा? . . . तो असा.. (तेरे नाम से G लू…)"
##############
"खाली पडले तरी घाबरायचे नाही,
आयुष्यात कधीही पाय कापतील, तोल जाईल . . . आणि . . . . . खाली पडले तरी घाबरायचे नाही, . . हिम्मत आणि धिर धरुन उठा आणि आवाज द्या: . . वेटरऽऽर…., आयच्या गावात..!!! . . 1 “बीअर” आणखी आण.."
##############
"आई : चिंटू काय करतो आहेस??
चिंटू:वाचत आहे .
आई:काय वाचत आहेस?
चिंटू:आई तुझ्या होणाऱ्या सुनेचे मेसेजेस"
##############
"भन्नाट विनोद…
एक मुलगा आणि मुलगी दोघे बाईक वरुन चाललेले असतात ………
थोडे अंतर गेल्यावर..
मुलगा मुलीला…,
मुलगा-;अरे मी हात सोडुन बाईक चालवु का?……
मुलगी-:मग आपण दोघे पडु शकतो ना बाईकवरुन…
.
.
.
.
.
मुलगा-:मग ऐका हाताने शेँबुड पूस ना माझ्या नाकाचा….!!"
##############
"""Aali Lahar . Kela Kahar""
एका बाई ने
येणाऱ्या बसला थांबवले ...
.
Driver : कुठे जाणार ..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय
जरा पोमपोम वाजवून दाखवा की .....!!!!!"
##############
"बंडया रडत रडत घरि आला ॰
बाबांनि विचारलॆ ""काय झालॆ बंडया""
बंडया: ""मास्तरानि मला मारले""
बाबा : ""काहितरि आगाउगिरि केलि असशिल""
बंडया: नाहि बाबा , मास्तरानि प्रश्न विचरला कि ३ लिंगॆ कोनति ?
बाबा : मग तु काय म्हणालास ?
बंडया: पुल्लिग , स्त्रिलिन्ग व नपुसक लिन्ग
बाबा : बरोबर आहे , मग का मारल ?
बंडया: मास्तरानि उदाहरण विचारले
बाबा : तु काय म्हणालास ?
बंडया: तो फ़ळा , ति शाळा आणि ते मास्तर ........... ::)"
##############
"मुलगी ; तू काय काम करतोस
मुलगा ; लोकमत , म. टा. अशा मोठमोठ्या न्यूज पेपर साठी काम करायचो
पण आता ते काम मी सोडले
...
मुलगी ; अरे वेडा आहेस का? एवढे छान काम तू सोडलेस का सांग?
मुलगा ; जाऊ दे ग ,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
रोज सकाळी सकाळी ५ वास्ता उठून कोण दुसर्यांच्या घरी पेपर नेवून टाकील.........."
##############
"चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.
बंटू : अरेरे बिच्चारी.
चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.
बंटू : तुला कसं रे कळलं.
चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करकरीत नवीन आहे."
##############
"ज्या साउथ इंडियन फिल्ममध्ये हिरो फुल्ल मार खाऊन जेव्हा पाच मिनिटासाठी कोमात गेलेला असतो तेव्हा त्या हिरोच्या बहिणीचा एक डायलॉग अगदी फिक्स असतो
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
भय्या…………. उठो भय्या………मारो उसे छोडना मत"
##############
"मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय
मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ....
मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तरराहुद्या"
##############
"खतरनाक प्रपोज :
शिंचन :- तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो
.
मुलगी :अय्या खरंच
.
शिंचन:- हो खरंच
.
आणि तु फक्त नाय म्हण
.
.
तुझी पण वाट लावतो .."
##############
"पप्पा - आज चिकन आणलाय पण
लिंबू नाही ...
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या- जाऊ द्या न आता,,नवीन विम बर आलाय त्यात १००
लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन
थेंब.]]"
##############
"१ बे रोजगार मुलगा होता,
त्याने गुलाबाचे फूल फ्रीजर मध्ये
ठेवले,.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि मग दुसर्या दिवशी ...
त्याला ""रोज-गार"" मिळाला"
##############
"डॉक्टर- काय हो, तुमचे पुढचे तीन दात कसे पडले?
गंपू- काय सांगू, माझी बायको चपात्या खूप कडक बनवते हो.
डॉक्टर- मग तिला स्पष्ट सागायचं ना, मी खाणार नाही म्हनुन.
गंपू- हो, तेच सांगितलं आणि म्हणूनच ……"
##############
"प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारतो , म्हणून.
प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
------------------------------
प्रश्न - कारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.
खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास----
उत्तर- ग्लास काळा होईल.
मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
चिमण्या झाडावर चहा पितात.........."
##############
"मुलगा : शब्द तुझे, गीत माझे....
जीवन गाणे गाऊ का ?
मुलगी : गाल तुझे, हात माझे....
कानाखाली लाऊ का ?
:D हा..हा..हा.."
##############
"आत्महत्येचे दोन मार्ग
झटपट आत्महत्या : एक मोठा दोर घ्या. गळ्यात अडकवा. छताला लटका! .
रमतगमत आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या. ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा!!!!"
##############
"भारतात सध्या ४ प्रमुख मोठ्या समस्या आहेत ...
१) लोकसंख्या
.
२) भ्रष्टाचार
.
३) महागाई
.
आणि सर्वात मोठी समस्या
४) तरुणांना प्रत्येक आठवड्यात होणारे अगदी खरे खरे... प्रेम...."
##############
"गमतीदार प्रेम पत्र
प्रिये ,
वडापाव दिसला की , मला तुझी आठवण येते. मग मला सांग, वडयाशिवाय पावाला म्हणजे माझ्याशिवाय तुला कसे रहावेसे वाटेल?
वड़्याशिवाय पावाला चव नसते. पावाशिवाय वड़्याला चव नसते. शेवटी वड़्याला पावात विलीन व्हायलाच लागते.
त्याचप्रमाणे तुझे आणि माझे मिलन झाल्याशिवाय आपल्या प्रीतीला चव कशी येईल? पत्र संपवतो. कारण माझा वडापाव आता खावून संपला आहे. पत्रावे उत्तर देखील वटाट़्याने भरलेल्या समोशासारखे देणे.
तुझा फक्त तुझाच
वडा............ ..."
##############
"प्रिये,
तुझ्या आठवणींनी माझे मन पाण्यात टाकलेल्या चुन्याप्रमाणे खदखदते आहे.
प्रत्येकवेळी ""O2"" आत घेताना आणि ""CO2"" बाहेर सोडताना मला तुझीच आठवण येते. तुला हातात ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा तु हवेत उघड्या ठेवलेल्या नेप्थॅलीनप्रमाणे उडुन जातेस. त्या विरहात माझे ह्र्दय यलो फॉस्फरस प्रमाणे भुर्कन जळुन गेले. तु असशील तेथुन लोहकणांसारखी चुंबकाकडे आकर्षित हो !
मला अजुन ते दिवस आठवतात, जेव्हा प्रयोग शाळेत बसून मी तुझ्या डोळ्यांतील ""अल्कोहोल"" पीत असे. त्या नाजुक ओठातील ग्लुकोज खाण्याचा मोह मला अनेक वेळा टाळावा लागला. ऍक्टीव्हेटेड कंपाऊंड प्रमाणे असणारे तुझे सरळ केस, एका ओळीत लावलेल्या टेस्ट ट्यूब प्रमाणे तुझे सुंदर दात, तुझ्या नाकातील चमकी Ring Test मध्ये येणाऱ्या Ring प्रमाणे भासे , तर कानातील रिंगा physical balance मधील पारड्याप्रमाणे लटकत असत.
दोन वेगळे रंग दाखवणाऱ्या लिट्मस पेपरप्रमाणे तुझी व्रुत्ती आहे, हे माहीत नव्हत मला. आपण बेन्झीन आणि ऑईलचे मिश्रण आहोत हे माहीत नव्हत मला. आता सारेच संपले आहे. तुझ्या प्रिलिमनरी टेस्ट्मध्ये पास होऊनसुद्धा.
तुला धरणारा ब्युरेट स्टॅंण्ड."
##############
"एक बाई दुसर्या बाईला विचारले
पहिली बाई : तुम्ही गहू कसा आणला?
दुसरी बाई : पिशवीतून आणला.
पहिलीबाई : तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दुसरी बाई : चुलत भावाने आणला."
##############
एक वयस्कर (स्वभावाने पुणेकर) एका बँकेचा चेक घेऊन दुसऱ्या बँकेत भरायला गेले. चेक कॅश व्हायला दोन दिवस लागतील, मध्ये एक सुट्टी आहे हे काही त्यांच्या पचनी पडलं नाही. समोरच बँक असल्याने झटपट व्हायला पाहिजे हा हेका आणि तरीही प्रोसिजर असते हे समजावण्याचा बँकेतील कारकूनाचा प्रयत्न अशी जुगलबंदी रंगली. शेवटी बँकेच्या इरसाल कारकूनाने पुणे-अस्त्र च काढलं. हे बघा, तुम्ही वैकुंठ स्मशानभूमीच्या दारात मेलात तरी थेट सरणावर चढवत नाहीत ना. आधी ससूनला नेऊन तपासतील, डेथ सटिर्फिकेट देतील, मग घरी नेऊन हार घालतील. नंतर वैकुंठकडे.
##############
"शाम - आई ,पिवळा रंग महाग असतो का ग ?
आई - नाही .
शाम - मग तू शेजारचा काकूंना सांगत होतीस ना ,
हल्ली मुलीचे हात पिवळे करायला खूप पैसे जमवावे लागतात ."
##############
"व्यावहारिक सल्ला
जेननेक्स्टचे तत्त्वज्ञान - पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत, पण सायकलवर बसून रडण्यापेक्षा बीएमडब्ल्यूमध्ये बसून रडणे केव्हाही चांगले!
प्रख्यात लेखक ऑस्कर वाइल्डचा एक गमतीदार कोट-
काही जण जिथे जातात तिथे आनंद निर्माण करतात, तर काही जण जेव्हा जातात तेव्हा आनंद निर्माण होतो."
##############
"स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना आठ मुले होती.
त्याबद्दल अत्र्यांच्या मराठा वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असायची.
अत्र्यांनी गिरी , सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केला
आणि त्याखाली हेडिंग दिले
गिरी आणि त्यांची काम गिरी"
##############
"एकटा पुरतो ना ?
आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.
मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.
अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.
> अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले ,
अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता
पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ?
बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले ,
बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ?
तर . चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की !
आणि कोंबडे किती ?
फक्त एक हाये
एकटा पुरतो ना ?
उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला
पत्रकारही त्या हंशात सामील झाले."
##############
"कार..
अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी
पायी कामासाठी जात
होते.
तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले
काय बाबूराव आज पायी पायी , काय कार विकली की काय ?
अत्रे म्हणाले. अरे आज तुम्ही एकटेच ? वहिनी दिसत नाही बरोबर ?
कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?"
##############
"एकदा शरद पवार,राजा आणि कलमाड़ी हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते
पवार १००रु.ची नोट खाली टाकतात.आणि म्हणतात..
""मी एका गरीब भारतीयाला सुखी केले""
मग राजा ५०रु च्या दोन नोट टाकतात आणि म्हणतात..
""मी दोने गरीब भारतीयाना सुखी केले""
मग कलमाड़ी १रु च्या १००नाणी टाकतो आणि म्हणतात..
""मी १००गरीब भारतीयाना सुखी केले""
हे ऐकून पायलट म्हणतो
""मी तुम्हा तिघाना टाकुन देईन आणि १२५कोटि भारतीयाना निरंतर सुखी करेन""
आणि ते पायलट होते
""आपले अन्ना हजारे*.""
*असे आपण गृहित धरू. ;)
जय हिंद!!वन्दे मातरम!!"
##############
"एका वाड्यात एक नवे जोडपे आले, जोशी काका ऑफिस ला निघताना जोशी काकू रोज म्हणायच्या -"" काहो ! पेरू चा पापा घेतला ना ?
पहिले वाड्यातला बायका हसायला लागल्या,मग चिडायला लागल्या.
एक दिवस त्यांनी वैतागून काकू ला म्हटले -"" अहो एवढा रसिकपणा ठीक नाही, आमच्या मुला आणि नवर्यांवर वाईट प्रभाव पडतो, ते सुद्धा आता फाजीलपणा करायला लागले आहे. हे सर्व बंद करा आता.
काकू: मी काय रसिकपणा केला ?
वाड्यातला बायका: अहो "" पेरू चा पापा घेतला ना "" याचा अर्थ काय तो आम्हाला काय समझत नाही का?
काकू: त्यात काय गैर आहे?
वाड्यातला बायका: इश्श ! तुम्हीच सांगा मग याचा अर्थ काय तो !!!
काकू: "" पेन,रुमाल,चाव्या,पास, पाकीट घेतले ना ? काकू नी निमुटपणे उत्तर दिले."
##############
"हॉटेल मध्ये ----
मुलगा - प्रिये आय लव्ह यू
मुलगी - नाही माझे तुझ्यावर अजिबात प्रेम नाही
मुलगा - हे बघ विचार करून सांग आपण हॉटेल मध्ये आहोत
मुलगी - नाही म्हणजे नाही
मुलगा वेटरकडून दोन वेगवेगळी बिले मागवतो दोन बिले पाहून मुलगी गोड हसून बोलते
मस्करी केली रे आय लव्ह यू"
##############
"पत्नी : अहो, मला पण तुमच्यासोबत
अमेरिकेला यायचे आहे......का नाही मला सोबत
घेऊन जात????
पती : वेडी आहेस का ? फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये
कोणी डब्बा घेवून जातो का ??"
##############
"शेजारी : प्लीज, मला रविवारपुरता तुमचा तबला द्याल का?
तबलजी : माझं वादन ऐकून तुम्हालाही आवड निर्माण झाली वाटतं?
शेजारी : नाही हो! किमान सुट्टीदिवशी तरी मला शांतपणे झोपायचंय..."
##############
"मी रोज चहा पितो. चहा प्यायल्या शिवाय माझा दिवस सुरू होत नाही.
चहा प्यायल्या वर फ्रेश वाटत. फ्रेश वाटल की झोप भुर्रSSSSS जाते.मी पण
सुट्टीत भुर्रS जाणारे ट्रिपला. ट्रिपला गेलो तरी चहा लागतो. माझा भाऊ कॉफी
पितो.तो म्हणतो कॉफी जास्त रिफ्रेशीग असते. मग आम्ही भान्डतो.सिरीयल
मधल्या बायका पण सारख्या भान्डत असतात.पण त्या चहा पित नाही भान्डत.
मी चहा पित भान्डतो.चहा काळा असतो पण दूध घातलं की लाईट ब्राऊन होतो.
माझा कुत्रा काळा आहे.पण त्याने दूध प्यायले तरी तो काळाचं राहतो.याला म्हणतात
जादु. जादु नावाचा एक एलियन ह्रितीक बरोबर राहायचा.तो ऊन प्यायचा आणि ह्रितीक
बोर्नव्हिटा प्यायचा.पण मी चहाचं पितो.मला चहा खूप आवडतो.
आता तुम्हीही चहा प्या आणि मला पण पियु द्या."
##############
"वडापाव दिसला की , मला तुझी आठवण येते. मग मला सांग, वडयाशिवाय पावाला म्हणजे माझ्याशिवाय तुला कसे रहावेसे वाटेल?
वड़्याशिवाय पावाला चव नसते. पावाशिवाय वड़्याला चव नसते. शेवटी वड़्याला पावात विलीन व्हायलाच लागते.
त्याचप्रमाणे तुझे आणि माझे मिलन झाल्याशिवाय आपल्या प्रीतीला चव कशी येईल? पत्र संपवतो. कारण माझा वडापाव आता खावून संपला आहे. पत्रावे उत्तर देखील वटाट़्याने भरलेल्या समोशासारखे देणे."
##############
आजारी असलेल्या नवऱ्याचे औषध आणायला बायको डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणाले, त्याला चांगले आवडीचे पदार्थ खायला घाल,अजिबात चीडचीड करू नकोस, घरातले प्रॉब्लेम्स त्याला सांगू नकोस. असं सहा महिने केलंस, तरच तो जिवंत राहू शकेल. घरी आल्यावर नवऱ्याने विचारले, काय म्हणाले डॉक्टर? बायको म्हणाली, ते म्हणाले की तू काही दिवसांचाच सोबती आहेस!
##############
"दिल है छोटासा.....
छोटीसी आशा....
मोठी लता,
आणि मधली उषा."
##############
"सगळ्या अमेरिकन मुलांची नाव,
जॅकसन
विलसन
मार्कसन
रोबिनसन
केनसन
जॉनसन
डेविडसन
जेमसन
सॅमसन
अशी का असतात?
कारण त्यांच्या आयांना लक्षात ठेवायला बर पडत कि कोणाचा बाप कोण आहे ते"
##############
"एका माणसाकडे २ गाया असतात पण त्यातली एकच गाई दूध असते असे का सांगा बर ?
कारण दुसरी गाय गोगलगाय असते म्हणून."
##############
"एकदा एक माणूस समुद्रा काठी उभा असतो.
एक प्रचंड मोठी लाट येते आणि त्या माणसाला म्हणते -
चल माझ्या बरोबर....आणि तो जातो.......का ?
कारण....पाण्याला कधी नाही म्हणू नये."
##############
"1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो...."
##############
"अमित :- वर आकाशात नेहमी पाऊस पडत असतो का?
अजित :- नाही.
अमित :- मग विमानातुन उडी मारताना लोक नेहमी छत्री का उघडतात?"
##############
"शिक्षक : अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यावर कुठे सह्या करण्यात आल्या?
गंपू : कराराच्या तळाशी!"
##############
"गझनी मध्ये आमिर खानने एट पॅक्स कसे बनवले?
तो जिमहून परत यायचा. व्यायाम झालाय हेच विसरायचा. आणि परत जायचा!"
##############
"जुळ्यांमधला एक तरी दुष्ट असतोच.
बॉम्ब निकामी करताना कोणती तार कापायची याचा फार
विचार करत बसू नका. कोणतीही कापा, ती नेहमीच योग्य असते.
हिरोला रस्त्यात नाचायची हुक्की आली, तर त्याला रस्त्यात
भेटणाऱ्या प्रत्येकाला नाचाच्या स्टेप्स माहिती असतात!"
##############
रमा धावतधावत ठमाकडे येते आणि म्हणजे, अगं, बाहेर तिघी जणी तुझ्या सासूला मारहाण करताहेत. ठमा बाहेर येते आणि बघत उभी राहते. तू नाही जात पुढे? रमा विचारते. ठमा उत्तरते, कशाला? तिघी पुरे आहेत की!
##############
"एक तरुण मुलगा व एक प्रौढ मनुष्य रेल्वे प्रवासात समोरासमोर बसले होते.
प्रौढ माणसाच्या हातात घडय़ाळ होते. तरुणाने त्यांना विचारले, ‘किती वाजले?’
प्रौढ माणूस म्हणाला, ‘तू मला टाईम विचारला. मी तुला टाईम सांगितला की, तू आणखी बोलत बसशील. माझ्या जवळचे पुस्तक, पेपर घेऊन वाचशील. पुढच्या स्टेशनवर कदाचित चहा पाजशील, नाश्ता करवशील. अशाने आपली ओळख वाढेल. मग तू मला एखादे दिवशी जेवायला घरी बोलावशील. मग नाईलाजाने मलासुद्धा तुला जेवायला घरी बोलवावे लागेल. त्या निमित्ताने तू माझ्या सुंदर मुलीला पाहशील, तुमची ओळख होईल कदाचित तुम्ही प्रेमातसुद्धा पडाल. मग हळूच एकेदिवशी तू माझ्या मुलीचा हात मागशील, आणि आणि.. मी माझ्या मुलीचा हात अशा कफल्लक तरुणाच्या हाती बिलकूल देणार नाही. ज्याच्या हातात साधे घडय़ाळ नाही.."
##############
"बबडी : अरे देवा...देवा...काय हे? आज उद्यानात एवढी कागदं कसली पडली आहेत?
बंड्या : अगं काल पालिकेने निवेदनं नाही का वाटली? उद्यानात कचरा करू नये म्हणून...
त्याच निवेदनांचे कागद आहेत ते."
##############
"बंड्या : तुला सांगतो जर मी एका श्रीमंत मुलीशी लग्न केलं ना तर माझे सगळे प्रॉब्लेम संपतील.
खंड्या : अरे मग लगेच करून टाक की.
बंड्या : पण एक प्रॉब्लेम आहे यार.
खंड्या : अरे त्यात काय? अशा कितीतरी मुली तयार होतील की.
बंड्या : हो... मुली तयार होतील रे. पण माझी बायको नाही ना तयार होणार."
##############
"एका कॉलेजमध्ये वर्गात एक महत्त्वाची चाचणी परीक्षा घेण्यात येणार होती. पण राम- शाम- गणपत- दलपत हे चार मित्र रात्रभर मौजमस्ती करत फिरत होते व त्यामुळे परीक्षेची तयारी करू शकले नाही. परीक्षेच्या दिवशी सकाळी त्यांनी एक योजना आखली. चौघांनी तोंडाला माती फासली. कपडय़ावर ऑईल, ग्रीसचे डाग पाडून घेतले व अशा अवतारात पडलेल्या चेहऱ्याने प्रोफेसर समोर उभे राहून याचना करू लागले की, सर काल रात्री आम्ही एका लग्नाला गेलो होतो. येताना आमच्या कारचे टायर पंक्चर झाले. स्टेपनी पण नादुरुस्त होती म्हणून रात्रभर गाडी ढकलत- ढकलत हॉस्टेलपर्यंत आणावी लागली व म्हणून टेस्टसाठी तयारी करता आली नाही तरी आमची टेस्ट २-३ दिवसांनी घ्यावी. प्रोफेसर दयाळू होते त्यांनी संमती दर्शवली. तिसऱ्या दिवशी अभ्यास करून चौघे विद्यार्थी प्रोफेसरसमोर हजर झाले तेव्हा प्रोफेसरांनी एक अट घातली की तुम्हा चौघांना वेगवेगळ्या खोलीत बसून पेपर लिहावा लागेल. चौघे तयार झाले. प्रत्येकाला दोन प्रश्न असलेली १०० मार्काची प्रश्नपत्रिका दिली गेली.
प्रश्न पहिला- तुमचे नाव लिहा (दोन मार्क).
प्रश्न दुसरा- कोणते टायर पंक्चर झाले होते?"
##############
"जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा कोणी लक्षात ठेवत नाही .
जेव्हा तुमची चूक असते तेव्हा कोणी विसरत नाही ."
##############
विवाहित पुरुषांनी आपल्या चुका विसरून जाव्यात. एकच गोष्ट दोघा- दोघांनी लक्षात ठेवण्याची गरज नसते.
##############
"मी माझ्या बायकोला सगळीकडे घेऊन जातो.
पण दुदैर्वाने तिला परत घराचा रस्ता सापडतो."
##############
"पुरुष आणि बायका यांच्यातला महत्त्वाचा फरक... पुरुष हवी असलेली पाच रुपयांची वस्तू दहा रुपये देऊन विकत घेतात.
बायका नको असलेली दहा रुपयांची वस्तू पाच रुपये देऊन विकत घेतात. कारण सेल लागलेला असतो."
##############
"चिकट चिंगूमल आपल्या २० वर्षांच्या संसारानंतर पहिल्यांदाच चिंगीला घेऊन हॉटेलमध्ये येतो आणि कॉफी ऑर्डर करतो. एवढ्या वर्षांनंतर चिंगूमल पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर घेऊन आल्यामुळे चिंगी सॉलिड खूश झालेली असते. त्याच्याकडे प्रेमाने पाहत, अगदी सावकाश ती कॉफी पित असते. तेवढ्यात चिंगूमल तिला ओरडतो, अगं, लवकर पी ना कॉफी. नाहीतर थंड होईल.
चिंगी : होऊ दे की मग?
चिंगूमल : अगं, अशी काय करतेस? मेन्यू कार्ड बघ. हॉट कॉफी २० रुपये, पण कोल्ड कॉफी ४० रुपये..."
##############
एका प्रेमवीराचे मत- माझी गर्लफ्रेण्ड म्हणते, मी आणखी प्रेमळ असायला हवं. आता मला दोन गर्लफ्रेण्ड आहेत.
##############
"इसो प्रमुख : काँग्रॅटस. तुम्हाला चंदावर पाठवायचं ठरतंय, उद्याच जायचंय. तयारीला लागा.
अॅस्ट्रोनॉड संता : उद्या शक्य नाही सर.
इसो प्रमुख : शक्य नाही? पण का.
अॅस्ट्रोनॉड संता : उद्या अमवास्या आहे ना!"
##############
"नदीतला एक मासा पोहता पोहता काँक्रीटच्या भिंतीला आपटला,
तर काय म्हणेल?
डॅम!"
##############
"राजा चांगली बातमी स्वत: जाहीर करतो आणि वाईट बातमीची
घोषणा करण्याची
जबाबदारी नोकरांवर ढकलून देतो."
##############
"ढमढेरे सर : बरं का मुलांनो, जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. याचा शोध १७७३ साली लागला.
पिंट्या : हुश्श! बरं झालं बुवा, मी १७७३ नंतर जन्मलो. त्याच्याआधी जन्मलो असतो तर मी श्वास कसा घेतला असता.
बँक मॅनेजर : अच्छा म्हणजे तुम्हाला आमच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट या नव्या डिपार्टमेण्टमध्ये नोकरी हवीय.
बबन : होय तर.
बँक मॅनेजर : बरं, मग मला सांगा. सायक्लॉन म्हणजे काय?
बबन : सोप्पाय, सायकल घेण्यासाठी कस्टमरला हवं असलेलं लोन."
##############
एक गमतीदार नायजेरियन म्हण- मांजराकडे बघून उंदीर हसत असेल तर समजावे की त्याचे बीळ जवळच आहे.
##############
"लॅपटॉपचे बि-हाड पाठीवर
बडा सीपीयू , पोकळ डेटा
चार दिवस हार्ड डिस्कचे , चार दिवस सीडीचे"
##############
"उसने जिस जिस जगह रखे कदम
हमने हर वो जमीन
चूम ली
और वौ बेवफा घर आ के बोले -
काकू , तुमचा मुलगा माती खातो !!"
##############
"बायको : आपल्या मॅरेज सटिर्फिकीटकडे एवढं बारकाईने काय बघतोयस?
नवरा : काही नाही गं, त्याची एक्सपायरी डेट शोधतोय!"
##############
"हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, ‘‘ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले.’’ वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला, ‘‘अरे, हे काय करतो आहेस ?’’
त्यावर तो वेटर म्हणाला ‘‘या बटनाबरोबर सुई-दोराही होता, तो शोधतोय !’’"
##############
‘जो स्वतःला शहाणा समजत असेल त्याने उभे रहावे.’’ मास्तरांनी सांगितल्यावर बर्याच वेळाने एक मुलगा हळूच उभा राहिला. त्याला मास्तरांनी विचारले, ‘‘तू स्वतःला फार शहाणा समजतो म्हणून उभा राहिलास का !’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘नाही सर वर्गात तुम्ही एकटेच उभे होतात हे पहावेना म्हणून मी उभा राहिलो.’’
##############
"तडका - चिंता
कामापेक्षा चिंताच माणसाला जास्त छळते. कारण बहुतेक जण कामापेक्षा चिंताच जास्त करतात.
खसखस - कंजूष
कंजूष नातेवाईकाबरोबर आयुष्य काढणं कठीण असतं. पण कंजूष पूर्वजामागे आयुष्य काढण्यासारखी दुसरी चैन नाही.
तडका - फसवणूक
वर्तमानपत्र विकत एक लहान मुलगा ओरडत असतो, पंचवीस जणांना फसवले, पंचवीस जणांना फसवले!
कुतुहलाने एक माणूस जवळ येतो, पेपर विकत घेतो. पहिल्या पानावर बघतो तर तो आदल्या दिवशीचा पेपर असतो. संतापून तो माणूस पेपरवाल्याला जाब विचारतो, कुठाय फसवणुकीची बातमी? पेपरवाला त्याच्याकडे दुर्लक्ष करून ओरडायला सुरुवात करतो, सव्वीस जणांना फसवले, सव्वीस जणांना फसवले!
रिपीट
नवरा : पुरुष एका दिवसाला १५ हजार शब्द बोलतात, तर बायका दिवसाला ३० हजार शब्द बोलतात.
बायको : कारण तुम्हा पुरुषांना प्रत्येक गोष्ट दोनदा सांगावी लागते!
नवरा : काय?"
##############
बस खचाखच भरली होती. कुणी सीटवरुन उठत नसल्यानं उभ्या असलेल्यांपैकी कुणालाच बसायला मिळत नव्हतं. एका सीटवर खूप वेळ एक जाडजूड इसम बसला होता. तो उठत नसल्याचं पाहून एक तरुण खोचक स्वरात म्हणाला, ही सीट हत्तींसाठी राखीव आहे का? त्याबरोबर जागेवरुन उठत तो उत्तरला, असं काही नाहीय. इथे गाढवंसुद्धा बसू शकतात की.
##############
"तडका - लक्ष
एका शाळेत खाऊचे वाटप सुरू असते. मुले रांगेत येऊन आपला खाऊ घेत असतात. सफरचंदाच्या टोपलीत शिक्षकांनी एक चिठ्ठी ठेवलेली असते, प्रत्येकाने फक्त एकच सफरचंद घ्या. देवबाप्पाचं लक्ष आहे. पुढच्या चॉकलेटच्या खोक्यात एक खट्याळ मुलगा चिठ्ठी ठेवतो, पाहिजे तेवढी घ्या, देवबाप्पाचं सफरचंदाकडे लक्ष आहे..."
##############
"प्रख्यात लेखक ऑस्कर वाइल्डने फॅशनची गंमतीदार व्याख्या केलीय.
तो म्हणतो, फॅशन म्हणजे कुरूप आणि बेंगरूळपणाची कमाल मर्यादा,
जी सहा महिन्यातच असह्य
होते आणि त्यामुळे बदलावी लागते."
##############
आपल्या सुनेला हिणवण्यासाठी आणि मुलाचीही परीक्षा पाहाण्यासाठी आईने आपल्या मुलाला विचारले, ‘‘बेटा, जर मी आणि तुझी बायको आम्ही दोघी बुडायला लागलो तर तू कुणाला वाचवशील ?’’ तेवढ्यात सुनबाई म्हणाली, ‘‘हे पहा तुम्ही तुमच्या आईलाच वाचवा. कारण मला वाचवायला तर अनेकजण पुढे सरसावतील !’’
##############
"अमेरिकेतील जपान- दुतावासात घडलेला एक सत्य(?) प्रसंग.....
जपानचे पंतप्रधान मोरी यांना अमेरिकेत जाऊन बराक ओबामा यांना भेटण्यापूर्वी प्राथमिक इंग्रजी बोलण्याचे धडे देण्यात आले.
त्यांना शिकवणाऱ्या माणसाने त्यांना सांगितले...
तुम्ही जेव्हा ओबामांशी हस्तांदोलन कराल तेव्हा त्यांना विचारा, "" हाऊ आर यु ? "" (HOW ARE YOU ? )
मग मि. ओबामा म्हणतील, ""आय एम फाईन , अन्ड यु ? "" ( I AM FINE , AND YOU ?) , या वेळी तुम्ही म्हणा, मी टु...( ME TOO ...) यानंतरचे सारे काम तुमचा दुभाषा पार पाडील.
किती सोपं वाटत नाही......
आता नक्की काय घडलं ते ऐका....
मोरी जेव्हा ओबामांना भेटले तेव्हा त्यांनी विचारले , "" हु आर यु ? ( WHO ARE YOU ?) ( त्यांना HOW ARE YOU ? विचारायचं होतं.)
ओबामा आश्चर्यचकित झाले, पण हसून ते म्हणाले, "" वेल, आय एम मिशेल्स हसबंड, हा हा ...."" ( WELL , I AM MICHELLS HUSBAND HA ... HA ....)
त्यानंतर मोरींनी प्रतिउत्तर दिलं,
"" मी टू.......हा हा..... ( ME TOO ....HA HA ...)""
नंतर त्या खोलीत नुसती शांतताच पसरली......"
##############
"एका आळशाचं तत्त्वज्ञान
कबूल आहे की, मेहनत करण्यात काही नुकसान नाही... पण रिस्क का घ्या?"
##############
"इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चचिर्ल यांनी आपल्या शैलीत
अमेरिकेवर टीका करताना म्हटलं होतं,
अमेरिकन नेहमी योग्य तेच करतात,
अर्थात बाकी सगळे पर्याय संपले असतील तरच !!"
##############
"संक्रांतीला तिळगूळ द्यायला आलेल्या जुन्या मित्राला सुरेश आपली प्रेमकहाणी सांगत होता-
... मी तिच्या प्रेमात पडलो हे तिला कसं कळणार...
का?
कारण माझ्यात ते सांगण्याचं धाडस नव्हतं. म्हणून मग मी माझ्या एका धाडसी मित्रामार्फत एकदा तिला फूल दिल.
नंतर...
काही दिवसांनी मित्रामार्फतच प्रेमपत्र दिल.
शाबास!
आणि आज सकाळीच संक्रातीच्या मुहूर्तावर भेटकार्ड आणि तिळगूळ...
स्वतः दिलेस?
नाही... मित्रामार्फतच दिले.
मग पुढे काय झालं?
ती त्या मित्राला म्हणाली, की तू हे स्वतःसाठी का करीत नाहीस, मी लगेच होकार देईल!
आणि...
मग काय दोस्त दोस्त ना रहाँ... प्यार प्यार ना रहाँ... माझ्या प्रेमावर संक्रात आली रे!"
##############
"आरोपी : सरदारजी, काहीही करा. पण माझी शिक्षा फारतर जन्मठेपेवरच थांबवा.
सरदार वकील : ओय, डोण्ट वरी. तुला मी फाशी नाही जाऊ देणार.
खटला संपला. निकाल लागला.
आरोपी : काय झालं सरदारजी?
वकील : ओय, काँग्रॅट्स तुला जन्मठेप झाली. अरे, तुला बाइज्जत बरी करत होते. मी खटला लावून धरला आणि तुला हवी तशी जन्मठेप मिळवून दिली."
##############
"मोबाइलने आयुष्यावर इतकी सत्ता प्रस्थापित केलीय की,
बहुतेकदा या मोबाइलच्या चष्म्यातूनच इतर गोष्टींकडे बघितलं जातं.
हरवलेलं पुस्तक शोधणाऱ्या एका टीनएजरची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे,
यार, या पुस्तकाला मिस्ड कॉल पण देता येत नाही!!"
##############
"मनुष्यस्वभावाची गंमत काही औरच.
आकाशगंगेत ३०० अब्ज तारे असतात, यावर सगळेच विश्वास ठेवतात.
पण रंग ओला आहे असं म्हटलं की मात्र हटकून हात लावतातच!"
Post a Comment
Post a Comment