"७० वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायको ला विचारलं,
मि जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटत का ग?
बायको (कुत्सितपणे हसून) : नाही हो, बिलकुल नाही, कुत्रासुद्धा गाडीच्या मागे धावतो,
पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी?"
##############
"झम्प्याची आई : २० वर्ष मला एकही मुलगा नाही झाला…. . .
मीडियावाले : मग तुम्ही काय केले ? . .
झम्प्याची आई : मग २१ व्या वर्षी माझ्या वडिलानि माझे लग्न लावून दिले आणि मग झम्प्या झाला…."
##############
"एक मुलगा आणि मुलगी दोघे बाईक वरुन चाललेले असतात ………
थोडे अंतर गेल्यावर..
मुलगा मुलीला…,
मुलगा-;अरे मी हात सोडुन बाईक चालवु का?……
मुलगी-:मग आपण दोघे पडु शकतो ना बाईकवरुन…
.
.
.
.
.
मुलगा-:मग ऐका हाताने शेँबुड पूस ना माझ्या नाकाचा….!!"
##############
"पक्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?
मंग्या : अरे बहिणीशी रे ...
पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?
मंग्या : बहिण तुझी आहे"
##############
"Marathi Lover Tu mazi zali nais mhanun mi chidlo hoto,
Tu mazi zali nahis mhanunmi chidlo hoto,
Ani tuzya lagnat aher na detach jewlo hoto."
##############
"तिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला
आणि तिजोरी वर लिहलं होत,
""तोडायची गरज नाय,
बटन दाबा, तिजोरी आपोआप उघडेन""
.
.
बटन दाबताच तिथे पोलिस आले.
.
.
.
.
.
चोर-
""आज माझा माणुसकी वरून विश्वास पुर्णपणे ऊठला"""
##############
"एक परदेशी व्यक्ती १ महिन्यापासून महाराष्ट्रात
रहायला आला...
या कालावाधीमध्ये तो २ च वाक्य
बोलायला शिकला!!!...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.....लाइट आली!!! :D
आईच्या गावात....परत गेली!!! :-|"
##############
"वर्गात शिक्षक मुलांना सांगतात...
"" मुलांनी आपापसांत का भांडू नये...""
ते नंतर मुलांना ते प्रतिप्रश्न करतात,
“मुलांनो, तुम्हाला कळलं का मी काय सांगतोय ते...?
बंडू सांग पाहू, तुला काय कळलं ते?”
बंडू : आम्ही एकमेकांशी भांडायला नको.
शिक्षक : अगदी बरोबर...
पण का भांडायला नको?
बंडू : कारण परीक्षेला कुणाच्यामागे नंबर येईल
सांगता येत नाही...(खी... खी... खी.. )"
##############
"एक म्हातारी बाई रोज बस ने देवळात जायची.
ती ज्या बस ने जायची त्या बस कंडक्टरला रोज
बदाम काजू
खायला द्यायची.
एक दिवशी कंडक्टरने म्हाताऱ्या बाई
ला विचारले,""कि आजी मला रोज
काजू बदाम खायला का देते..?
म्हातारी बाई
म्हटली,""बेटा आता मी म्हातारी झाली आहे,
आणि त्यामुळे दात पण पडलेत, काजू बदाम
नुसते चघळून फेकून देन चांगल नाही ना.. :-D :-D"
##############
"मुर्गी अंडा देती हैं और गाय दूध देती हैं.
तो आप बताओ ऐसा कौन हैं जो दूध भी देता हैं और अंडा भी देता हैं ?
.
.
.
.
.
.
.
.
सोचो सोचो.............
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
दुकानदार"
##############
"गाढव : माझा मालक खूप मारतो
:
कुत्रा : तर तू पळून जा कि
:
गाढव: त्याची मुलगी जेव्हाअभ्यास् करत
नाही तेव्हा तो म्हणतो अभ्यास कर
नाही तर तुझ लग्न
एखाद्या गाढवाबरोबर लाऊन देईन बस
या एका आशेवर काम करतो"
##############
"रम्या : बघ,
ती मुलगी माझ्याकडे बघून हसली
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या : साहजिकच आहे.
मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो"
##############
"तो तीला म्हणाला , "" क्या हुआ
तेरा वादा ... ""
.
.
.
तो तीला म्हणाला , "" क्या हुआ
तेरा वादा ... ""
ती म्हणाली,
"" आता मी दुसरा पकडलाय,
आज पासुन तु माझा दादा..."" . . ."
##############
"भाजीवाला खुप वेळ्च भाज्यांवर पाणी शिंपड्त असतो.
शेवटी वैतागुन एक बाई म्हणते.
.
.
.
.
.
.
.
.
भेंडी शुद्धीवर आली असेल तर १ किलो द्या"
##############
"खाली पडले तरी घाबरायचे नाही,
आयुष्यात कधीही पाय कापतील, तोल जाईल . . . आणि . . . . . खाली पडले तरी घाबरायचे नाही, . . हिम्मत आणि धिर धरुन उठा आणि आवाज द्या: . . वेटरऽऽर…., आयच्या गावात..!!! . . 1 “बीअर” आणखी आण.."
##############
"प्रेयसी तिच्या प्रियकराला : आपण लपा-छपी खेळू.
तू मला शोधल्यावर तू मला शॉपिंग ला घेऊन जयचे....
प्रियकर : जर मी शोधू शकलो नाही तर????
प्रियसी : जानू.... असे नको ना म्हणू.....
.
.
मी इथेच,दरवाज्याच्या मागे लपते..."
##############
"भूत १- "" तू कसा मेलास?""
.
भूत २- "" थंडी ने कुडकुडून मेलो. आणि तू?
.
भूत १- "" काय सांगू यार........ बायकोवर संशय
होता, सगळा घर शोधलं,कोणी नव्हतं......... .
लाजेने मेलो.
.
भूत २- "" अरे साल्या फ्रीज तरी उघडायचा ........
दोघ वाचलो असतो!"
##############
"एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात
त्याच्या पायात काटा घुसतो......
.
.
.
.
कंजूस काटा काढत स्वताशिच : आयला बरे झाले
चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर
चप्पलला होल पडले असते...."
##############
"घरचा नोकर (दारात उभ्या असलेल्या अनोळखी माणसास) :- आपणास काय पाहिजे सर?
माणूस :- मला तुझ्या मालकास भेटायचे आहे.
घरचा नोकर :- काय काम आहे ते मला कळू शकेल?
माणूस:- मी एका पेमेंटच्या संदर्भात इथे आलो आहे...
घरचा नोकर :- ओ हो ... ते तर काल सकाळीच आपल्या गावी गेले ...
माणूस:- की जे पेमेंट मला आता त्यांना करायचे होते...
नोकर:- आणि ते आज सकाळीच परत आले आहेत..."
##############
"एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...
.... का?
;
;
;
;
;;
;
;
;
;;
;
;
;
;
;;
;
;
;
;
;
;
;;
;
;
;
;
;;
;
;
;
;
;
;;
;
;
;
;
;
;;
...अंगात मस्ती , दुसरं काय ?"
##############
"एका मुलीने आपल्या होणा-या नव-याला Message सेंट केला .
.
आपलं लग्न होवू शकत नाही ! कारण माझ लग्न दुस-या मुला सोबत ठरले आहे .
.
मुलगा Message वाचुन खुप दुखि होतो आणि रडाय लागतो!! .
२ मिंनटा नंतर त्या मुलाला Message येतो .
.
.
.
.
.
सॅारी........ सॅारी !!
.
चूकुन तुम्हाला हा Message सेंट झाला ."
##############
"लहान मुलाने त्याच्या breakup वर म्हटलेले एक सुंदर
रोमँन्टिक वाक्य...
.
.
.
मी तुला विसलण्याचा खुप प्लयत्न केला गं
.
.
.
पन ताय कलू
.
.
.
मम्मी मला दललोज बादाम थायला देते
म्हणुण तुजी आठवन पुन्हा पुन्हा येते.... ♥♥"
##############
"गोटयाचे बाबा त्यांच्या लग्नाचा अल्बम
दाखवत होते.
गोटयाला मस्करी करायची हुक्की आली.
गोटया : बाबा, तुम्ही लग्न मी जन्मावं
म्हणून केलंत ना?...
बाबा (गडबडून) : नाही रे, तसं नाही....
गोटया (ऐटीत) : नाही काय!
मी या जगात यावं म्हणूनच तुम्ही लग्न
केलं असणार.........
बाबा (वैतागून) : अरे तू यावा म्हणून
नाही.......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर तुझी यायची चाहूल लागल्यामुळे करावं
लागलं!"
##############
"एकदा स्विमिंग पुल मध्ये मुंग्या पोहत
होत्या अचानक 1 हत्ति त्यात
पडला सगळ्या मुंग्या बाहेर पळाल्या 1
मुंगी हत्तिवर चढुन बसली.
आणि दुसरी बाहेरुन म्हणालि , बुडव
साल्याला मुलींची कळ काढतोय नालायक"
##############
"मक्या : ज्योतिषी महाराज,
मला गर्लफ्रेण्ड
का नाही?
.
.
.
.
.
ज्योतिषी : कारण, तुझ्या कुंडलीत फक्त सुख
लिहिलंय........ ......"
##############
"वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
.
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
.
.
बंडू रडत रडत,
.
.
.
.
.
.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे"
##############
"दिनू - मंगू जंगलात गेले होते.
समोरून अचानक वाघ आला.
मंगू प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली
आणि तो दिनूला म्हणाला,
पळ पळ दिनू !
.
.
.
.
.
.
.
.
दिनू चिढून म्हणाला
मी का पळू?
माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!"
##############
"(आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते)
आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया
आजी : हो खरचं
...
आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन त्याच बागेत जिथे आपण भेटायचो
आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी
(आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत नाहित)
आजोबा : का गं आली का नाहीस?
आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry हां
( दोघे ही हसतात)"
##############
रजनीकांत ज्यावेळी पुशअप्स मारतो, त्यावेळी तो स्वत:ला वर उचलत नाही, तर पृथ्वीला खाली ढकलत असतो
##############
"एका विवाहित माणसाचे त्याच्या सेक्रेटरी बरोबर
अफेयर असते...
एकदा ते डेटिंगला जातात..
त्यांना खूप उशीर होतो...
तो माणूस त्याच्या सेक्रेटरीला तिच्याघरी सोडून
क्रिकेटच्या मैदानावर
जातो...
आणी आपली प्यांट व शर्ट गवतावर घासून घासून
मळवतो....
घरी आल्यावर....
बायको : आज एवढा वेळ का झालाहो यायला...
नवरा : Actualy ..खरंच सांगतो...माझं
एका मुली बरोबर अफेयर आहे...
मी थेट डेटींग वरूनचयेतोय...
बायको : जवळ येउन त्याला मिठीमारते
आणि बोलते...
""खोटारड्या ..क्रिकेट खेळायला गेला होतास ना..."""
##############
"एकदा एक चीनी, एक अमेरिकन आणि एक पुणेकर एका बोटीमध्ये प्रवास करीत होते.
तेवढ्यात तिथे एक जीन आला आणि म्हणाला तुम्ही काहीपण पाण्यात टाका मी ते शोधून काढणार, नाही शोधल्यास मी तुमचा गुलाम होणार.
पण मात्र तुम्ही पाण्यात टाकलेली वस्तू मी शोधून काढल्यास तुम्हाला मारून टाकणार.
हे ऐकून चीनी माणसाने पाण्यात सुई टाकली , जीन पाण्यात गेला व सुई शोधून काढली आणि चीनी माणसाला मारून टाकले .
आता अमेरिकन माणसाने आपल्या मोबाईल मधले मेमरी कार्ड पाण्यात टाकले , जीन पाण्यात गेला व मेमरी कार्ड शोधून काढले आणि अमेरिकन माणसाला मारून टाकले.
शेवटी पुणेकर माणसाने एक वस्तू पाण्यात टाकली , जीन ती शोधायला पाण्यात गेला पण त्याला काही केल्या ती वस्तू सापडलीच नाही!!!
शेवटी हताश होऊन जीन पुणेकर माणसाला शरणागत आला आणि विचारू लागला आका आपण पाण्यात काय टाकले?
तेव्हा पुणेकर माणूस मिस्कीलपणे म्हणाला...........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
""अरे वेड्या मी पाण्यात डीस्पिरिन (dispirin) टाकली होती"".
चल माझ्यासोबत आता, घरी बरीच कामे करायची राहिली आहेत......."
##############
"गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
मंजू : झेब्रा.
गणपुले सर : असं का बरं?
मंजू : कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना"
##############
"आजचा उपदेश :
जर कोनी आपल्याला पाहुन. दरवाजा बंद केला, तर...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आपन पन त्याला दाखवुन द्यायच, की दरवाज्याला""दोन""
कड्या असतात..."
##############
"अतिशय पाणचट जोक :
गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो
या महिन्यात पगार ऐवजी १००""कीस"" ( kiss ) पाठवतोय.
.
.
बायकोने उत्तर दिले ""तुमचे१०० कीस मिळाले.
हिशोब पाठवते...
.
.
.
दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल.
.
.
चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली,
.
.
भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली.
.
.
घरमालक रोज ७-८ घेऊन जातात
.
.
तुम्ही काळजी करू नका अजून३०-४० कीस बाकी आहेत,
या महीन्याच भागून जाईल......."
##############
"जगातील काही नमुने असलेली लोकं.
१. जे बस मधे चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात.
२. जे फ़ेसबुकवर स्वता:च्या पोस्टला स्वता:च लाईक
करतात.
३. जे स्वत:च्या एका मेल आयडिवरुन दुसर्यामेल
आयडिवर स्वत:च मेल पाठवतात. आणि
४. मराठी जे महाराष्ट्रात राहुनमराठी लोकांशी हिंदीत
बोलतात."
##############
"लग्नपत्रिका
!! लोकशाही प्रसन्न !!
कोपरापासून दंडवत, विनती विशेष.
आमच्या येथे लोभी व्यापरयांच्या कृपेने ...अनिच्षित सरकारच्या आशीर्वादाने
चि. भ्रष्टाचार
( स. ग. ळी. क. डे.)
(श्री.कु. प्रसिद्ध सारा काला बाजार यांचे अनिष्ट पुत्र )
यांचा शुभविवाह
चि.सों. का. महागाई
( सा.मा.न्य. जनता )
(श्री. कु. क. रा. आमटे यांची कन्या )
हिजबरोबर काळ्या रात्री १२ वा.२ मि.एच. ऍम. टी. मुहुर्तावर मनाविरुद्ध करण्याचे योजिले आहे तरी आपण सहकुटूब व् मित्रपरिवारासह येवून वधु वरा च्या कानाखाली आवाज काढावेत ही नम्र विनती.
आपले नम्र
श्री. व् सौ. मा रा जोड़े
श्री. व् सौ. स दा वाटलावे
श्री. व् सौ. क र बुडवे
श्री. व् सौ. भ रा खिसे
विवाह स्थळ
जुगार भवन,मटका गल्ली,भाववाढ रोड,सट्टा बाजार शेजारी,४२०
हळदीचे भाव वाढल्यामुले चुना लावला तरी चालेल.
टीप : कृपया घरचा आहेर आणने बधंनकारक आहे.
समस्त कालाबाजार बंधू
आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हं !
चि.खोटे,भामटे,चोरटे,लबाडे"
##############
"गृहस्थ: काय रे तुझही आई कशी आहे?
मुलगा: बरी आहे
गृहस्थ:बहीण कशी आहे?
मुलगा: बरी आहे
गृहस्थ: अच्छा, मग बाबा तर बरेच असतील
मुलगा: नाही, बाबा एकच आहेत........."
##############
"प्रपोज केल्यानंतर"" मुलीकडून साधारणता ""कोणती उत्तरे ""मिळू शकतात त्याबद्दल काही....
१. नाही SSSSSSS
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला तसल्या नजरेने पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी ""ऑलरेडी एंगेज"" आहे.
५. प्लीज, माझा असल्या ""फालतू गोष्टींवर"" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे शिक्षण, करियर व कुटुंबिय महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित ""आकर्षण"" असावे ...
७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला ""राखी"" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून मानसीक तयारी झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. ""आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!""
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !! ]
१६. होय,"
##############
"अमेरिकेत जेव्हा घरातली वीज जाते,
तेव्हा तिथली लोकं लगेच पॉवर हाऊसला फोन करतात आणि प्रॉब्लेम समजून घेतात.
जपानमध्ये जेव्हा घरातली वीज जाते, तेव्हा तिथली लोकं लगेच फ्युज तपासतात आणि लगेच बदलून घेतात.
भारतात जेव्हा वीज जाते, तेव्हा इथली लोकं शेजाऱ्यांच्या घरी डोकावतात आणि म्हणतात.... सगळ्यांचीच गेलीय ना... मग जाऊ देत!"
##############
मानसशास्त्राचे प्राध्यापक वर्गात आले आणि फळ्याजवळ जाऊन शिकवायला सुरुवात केली. इथे ज्यांना ज्यांना वाटतंय की आपण मूर्ख आहोत, त्यांनी उभे राहा. थोडावेळ वर्ग शांत राहिल्यावर गंपू उभा राहिला. म्हणजे तुला असं वाटतंय की तू मूर्ख आहेस? नाही सर, गंपू उत्तरला, पण तुम्ही एकटेच उभे आहात, हे मला बरं वाटेना!
##############
"तुफान पाऊस पडतोय...
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं...
हो ना?
अरे , हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?
प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!"
##############
पुणेरी झटका एक माणूस पहिल्यांदा पुण्यात येतो आणि एका पुणेरी माणसाला विचरतो - अहो इथे शनिवार वाडा कुठे येतो ? पुणेरी माणूस - हे पहा, इथे शनिवार वाडा येत नाही, तुम्हालाच तिथे जावे लागेल
##############
"वो गर्मियो कि शाम,
वो लक्ष्मी रोड का ट्राफिक जाम,
वो खडकवासला कि हवा,
वो बी जे मेडिकल कि दवा,
वो सर्दियो कि ठंडक,
वो क्लासरूम का मजा,
वो चितळे कि बाकरवडी,
वो तुळशी बाग मे शॉपिंग,
वो लेट रात कि पढाई,
वो चाचा हलवाई कि मिठाई,
वो डेक्कन कि कच्ची दाबेली,
वो के एन पी कि कॅड बी,
वो जोशी का वडा पाव,
वो रूपाली कि चाय,
वो Z ब्रिज के नजारे,
वो F C कि सडके जहा दिल है धडके,
वो A BC कि किताबे,
वो दगडूशेठ का मंदिर,
वो सारस बाग कि भेल,
वो मस्ती कि बाते
ऐसी है कूच पुणे कि यादे."
##############
"छोटू: अशक्य हा शब्द माझ्या डिक्श नरीत नाही
मोठू: आता बोलून काय फायदा . डिक्श नरी घेताना तू बघून घ्यायला पाहिजे होतीस .."
##############
"लेंढारे आणि पेंढारे बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटले
पेंढार्यानि लेढार्याची चौकशी करताना सहज विचारल,
""काय हो - तुम्हाला मूल किती ?
""चौदा -""
""बाब रे चौदा मूल ? सरकारी कुटुंब नियोजनेवाले
कधी आले नाहीत का तुमच्या घरी ?""
""आले होते ना. पण त्यांना वाटले, इथे शाळा भरलीय....
गेले परत""...."
##############
"प्रियकर आपल्या प्रियासी ला: मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसत, ???
बाजूनी जाणारा एक पुणेकर विचारतो: जरा कर्वे रोड वर ट्राफिक आहे का बघ रे"
##############
"1 कुटुंब हॉलमध्ये जेवायला बसतात. नवरा हात धुवायला
किचनमध्ये जातो. तेवढ्यात बायको हॉलमधून आवाज देते.
“अहो, येताना जरा मिठाची बरणी घेऊन या बरं.”
नवरा संपूर्ण किचनमध्ये मिठाची बरणी शोधतो पण
ती काही सापडत नाही.
मग बायको नवऱ्यावर ओरडते,
“ओ sssss, या अन
बसा जेवायला. मला माहीत होतं तुम्हाला नाही सापडणार
म्हणून.
म्हणूनच मी मिठाची बरणी अगोदरच आणून ठेवलीये"
##############
"चिंगूच्या कॉलेजचा पहिलाच दिवस असतो. फॉर्म भरण्याचं काम सुरू असतं.
सगळे रकाने भरता भरता चिंगू कायमचा पत्ता या रकान्यापाशी थांबतो.
थोडा विचार करतो.. आणि लिहितो..कायमचा पत्ता : फेसबुक डॉट कॉम."
##############
"मा साहेब :- पुत्र.....
पुत्र :- काय हुकुम आहे मा साहेब ?
मा साहेब :- इस्पिक"
##############
"फोनची बेल वाजते.
पहिला : हेलौ..
दुसरा : बोला.
पहिला : देशपांडे आहेत का ?
दुसरा(चिडून) : नाही, ते पावन खिंडीत लढतायेत!
पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.
हाहाहाहा."
##############
"अशा मजेशीर गोष्टी भारतातच होऊ शकतात,
१0-20 वर्षापूर्वी वडापाव १ रुपया आणि STD कॉल ७ रुपये होता.
आणि आता वडापाव ७ रुपये आहे आणि STD कॉल १ रुपया झालाय..."
##############
मोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना.. प्लीजजजजजज...!2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे..... आणि call केला की हवा पाण्याच्या गोष्टी करणार........ ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)...... हेलो बोल रे कसा आहेस ??Movie!!!!!नाही बाबा...घरी काय सांगु......पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळखिचे आहे.....कोणि बघितल तर.......मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीमखुप आवडते. (याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????)चालून चालून खूप पाय दुखले रे.... (म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे)
##############
"काही शब्दांच्या व्याख्या
वक्तृत्व : दोन मिनिटात सांगता येणा-या कल्पनेकरिता दोन तास घालविणे.
शेजारी : तुमच्या गोष्टींची तुमच्यापेक्षा अधिक माहिती जशीच्या तशी सांगणारा नारदमुनी.
बेकार पदवीधर : हातात ब्याग घेऊन प्रवास करणारा एस.टी. चा राखीव प्रवासी.
पुढारी : जनतेच्या जीवावर स्वताःचे भले करून घेणारा डोमकावळा.
मुंबई : माणसांनी गजबजलेले मनोहर संग्रहालय.
विद्यार्थी : परीक्षादेवीचा लाडका पुत्र.
फ्याशन : शिंप्याच्या हातून चुकून झालेला बदल.
रोगी : अशी आग आहे, जिच्यावर डॉक्टर पोळी भाजतात.
वकील : गुन्हेगारांचा बाप......नरकात दाखल होण्याचे फर्स्ट-क्लासचे तिकीट.
स्मशानभूमी : पृथ्वीवरचे शेवटचे स्टेशन.
ईश्वर : कोणालाही भेट न देणारा अभिमानी म्यानेजर.
नृत्य : पद्धतशीरपने लाथा झाडण्याची कला.
फ्याशनेबल स्त्री : नवा-याच्या १ तारखेच्या पगारावर नजर ठेवणारा प्राणी.
जीवन : मरण येईपर्यंत काहीतरी भानगडी करत घालवायचा काळ.
मन : नेहमी चोरीस जाणारी वस्तू.
शिक्षक : निमुटपणे देशकार्य करणारा गरीब प्राणी."
##############
विन्स्टन चर्चिल यांचा एक किस्सा सांगितला जातो. एकदा जोरदार वादावादीनंतर एक महिला चर्चिलना म्हणाली, तुम्ही माझे पती असता, तर मी तुम्हाला विष दिलंअसतं. चर्चिल उत्तरले, मी तुमचा पती असतो, तर मीच विष घेतलं असतं
##############
"मनमोहन सिंग संध्याकाळी चालायला जातात, सकाळी नाही. का?
कारण ते पीएम आहेत, एएम नाहीत!"
##############
"एका निर्जन ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी वेफर्स खात बसली होती.
मुलगी- विनू, आता या क्षणी तुला काय वाटतंय रे?
मुलगा- मला असं वाटतंय की, तू माझ्यापेक्षा जास्त वेफर्स खाल्लीत!"
##############
"बायको आणि सूर्य यात साम्य काय?
करा विचार...
नाही जमत, अहो सोप्पंय...दोघांकडेही डोळे वर करून बघता येत नाही."
##############
"चाळीशीच्या ठमाकाकू सुजलेल्या दाढेसह डेंटिस्टच्या
क्लिनिकमध्ये जाऊन बसल्या. डॉक्टरांचे नाव पाहून चपापल्या-
डॉ. नंदकिशोर गोरे ... अरे, हा तर आपल्या
वर्गात होता शाळेत... सगळ्या मुली मरायच्या त्याच्यावर...
ठमाकाकू : तुम्ही आदर्श विद्यालयात होतात का? सत्तरची बॅच?
डॉक्टर : हो, तुम्ही कसं ओळखलं?
ठमाकाकू : (लाजत) मी पण त्याच शाळेत होते.."
##############
(बायकांची) : मॉलमध्ये वरखाली फिरणे आणि अधूनमधून खरेदी करण्यासाठी विश्रांती घेणे.
##############
अंथरुणाला खिळलेल्या एक पेशंटला डॉक्टर सहा महिन्याची मुदत देतात. तोपर्यंत तो त्यांचं बिल देऊ शकत नाही. डॉक्टर आणखी सहा महिन्यांची मुदत देतात
##############
"एक माणूस मानसोपचारतज्ज्ञाकडे जातो.
माणूस : माझं कोणीच ऐकून घेत नाही.
मानसोपचारतज्ज्ञ : नेक्स्ट!"
##############
"हुशार बायको
हुशार बायको नव-याचे इतके पैसे खर्च करते की त्याला
दुसऱ्या बाईचे लाड पुरवणंच अशक्य व्हावं ."
##############
"प्रोफेसर विसराळू का असतात याचे कारण त्यांनीच शोधून काढले.
पण नंतर तेही विसरले."
##############
एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती. मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, दोन अधिक दोन किती? उमेदवाराने इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं, किती दाखवायचे आहेत? . त्याची निवड झाली.
##############
एक माणूस पोलिसांना फोन करून सांगतो, मी एका माणसावर चाकूने वार केलाय, लवकर या. पोलीस तातडीने तिथे पोहोचतात. त्यावर तो माणूस म्हणतो, खरं तर हल्लामाझ्यावर झालाय. तुम्ही लवकर यावं म्हणून मी उलटंच सांगितलं. खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल पोलीस त्याला आत टाकतात
##############
"एक मित्र : माझी बायको परी आहे!
दुसरा मित्र : नशीबवान आहेस, माझी बायको अजून जिवंत आहे."
##############
"बायको : आज मला स्वप्न पडलं होतं की व्हॅलेंटाइन डेला तू मला मोत्यांचा हार भेट दिला आहेस. काय असेल या स्वप्नाचा अर्थ?
नवरा : ते तुला व्हॅलेंटाइन डेलाच कळेल.
व्हॅलेंटाइन डेला छान रॅप केलेलं एक गिफ्ट त्याने बायकोला दिलं.
मोत्यांच्या हाराच्या उपेक्षेने उघडलं. त्यात एक पुस्तक होतं- स्वप्न आणि त्यांचे अर्थ"
##############
ट्रॅफिक पोलिसाच्या पदासाठी मुलाखती सुरू होत्या. एका उमेदवाराला प्रश्न विचारला, समज, तू ड्यूटीवर असताना एखादी कार भरधाव वेगात येताना दिसली, तू ती थांबवलीस आणि आत ड्रायव्हरच्या सीटवर तुझा भाऊ दिसला, तर काय करशील? उमेदवार तातडीने उत्तरला,
##############
"एक मित्र : व्हॅलेंटाइन डेला काय करणार?
दुसरा मित्र : दिवसभर गर्लफ्रेण्डचा हात हातात घेऊन बसणार... नाही तर ती शॉपिंग करत बसेल."
##############
टेलिफोनबाबत समाजशास्त्रज्ञांनी म्हटलं होतं- टेलिफोन हा सर्व सोयींमधला सगळ्यात मोठा उपदव आहे आणि सगळ्या उपदवांमधली सगळ्यात मोठी सोय आहे.
##############
"बायकोचा वाढदिवस लक्षात ठेवण्याचा सवोर्त्तम मार्ग -
एकदा विसरून बघा"
##############
"स्वर्गात आलेल्या स्त्रीला काय म्हणाल? देवदूत
स्वर्गात आलेल्या अनेक स्त्रियांना काय म्हणाल? देवदूतांचा घोळका
भूतलावरच्या सर्व स्त्रिया स्वर्गात आल्या तर त्याला काय म्हणाल? ...... पृथ्वीवर शांतता"
##############
"संता : छ्यॅ, आता मलाच काहीतरी करायला हवं.
बंता : अरे काय झालं तरी काय?
संता : छ्यॅ, काय सांगू यार माझं दु:ख.
बंता : बोल संते बोल... ये दोस्त सुनेगा!
संता : छ्यॅ, अरे यार माझी बायको जसमीत... माझ्या ड्रायव्हरसोबत काल रात्री पळून गेली.
बंता : कॉय सांगतोस कॉय? अरे बापरे! मग आता काय करणार रे तू?
संता : छ्यॅ. आता काय करणार. नवीन ड्रायव्हर मिळेस्तोपर्यंत मलाच गाडी चालवावी लागेल ना."
##############
"मराठी म्हणींचे अपडेटेड व्हर्जन
नाचता येईना, महागुरूं ना साकडे"
##############
वकील - ‘‘साहेब, माझ्या अशिलाच्या डाव्या हाताने चोरी केली अन तुम्ही सर्व शरीराला एक वर्षाची शिक्षा देताय ?’’ न्यायमूर्ती - (वकील विनोदाने बोलतोय असे समजून) ‘‘तर मग त्याच्या फक्त हाताला दोन वर्षाची शिक्षा देतो आता हाताबरोबर कसे जायचे हे त्याने ठरवावे.’’ वकीलाचा विनोद अंगाशी येऊन एक वर्षाऐवजी आता दोन वर्षाची शिक्षा झाली म्हणून इतर सहकारी वकील हसू लागले. तेवढ्यात आरोपीने आपला कृत्रीम हात काढून तो पोलिसांच्या स्वाधीन केला
##############
"पेशंट : डॉक्टर दीर्घायुष्यासाठी काय औषध आहे का?
डॉक्टर : आहे ना, लग्न करा.
पेशंट : लग्न केल्याने मी दीर्घायुषी होईन का?
डॉक्टर : नाही, पण दीर्घायुष्याची तुझी इच्छाच नाहीशी होईल."
##############
"कोकिळा बिघडली होती......
विन्या प्रधान पार्टीमध्ये रात्री उशिरापर्यंत रम ला. लॅच कीने दार उघडून, बाहेरच कपडे चेंज करून हळूच दार उघडून बेडरूममध्ये शिरला. बिछान्यात शिरणार इतक्यात बेडरूमच्या घड्याळातली कोकिळा ओरडू लागली, कुक् कुक्, कुक् कुक् ... पहाटेचे चार वाजले होते. विन्याच्या डोक्यातलं विचारचक्र गरगरू लागलं, कोकिळा चारच वेळा कुक् कुक् करणार. त्यानंतर आपण बेडमध्ये शिरणार. म्हणजे आपण पहाटेपर्यंत बाहेर उलथलो होतो, हे बायकोला कळणार. ती तमाशा करणार. हे टाळलं पाहिजे. क्षणार्धात त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली, आपणच कोकिळेचा आवाज काढून रात्रीचे १२ वाजवले तर!
चौथ्या कुक् कुक् नंतर बंड्याने पुढे आठ कुक् कुक् केले आणि तो बिछान्यात शिरला. बायकोने विचारलं, किती वाजलेत?
बाराच तर वाजतायत आत्ताशी, असं म्हणून विन्या झोपून गेला.
दुस-या दिवशी सकाळी बायको म्हणाली, हे घड्याळ दुरुस्तीसाठी नेलं पाहिजे.
का गं? विन्याने विचारलं.
अरे, काल मध्यरात्री या घड्याळातली कोकिळा बिघडली होती. चार वेळा व्यवस्थित कुक् कुक् केल्यानंतर ती ओह शिट म्हणाली. नंतर तीन वेळा कुक् कुक् केल्यावर तिने घसा खाकरला. आणखी तीन वेळा कुक् कुक् केल्यावर ती कॉर्नर टेबलला अडखळली आणि शेवटचे दोन कुक् कुक् केल्यावर चक्क शिंकली!!!!!!"
##############
"पहिला: का रे..? बराच आनंदी दिसतोय? आणि कपडे का असे खराब झालेत?
दुसरा: बायकोला माहेरी पाठवायला रेल्वे - स्टेशनवर गेलो होतो...
पहिला: अरे हो.. पण कपडे का असे खराब झालेत?
दुसरा: गाडी लवकर सोडावी म्हणुन इंजिन ड्राईव्हरला कडकडुन मिठी मारली ..!"
##############
मुलाच्या बौद्घिक, भावनिक विकासाबाबत अति जागरूक असलेल्या एका जोडप्याला सतत मुलाला काही ना काही कोडी घालण्याची सवय होती. असेच एकदा हॉटेलमध्ये गेल्यावर आईने त्याला विचारले, सांग पाहू आधी काय, कोंबडी की अंडं? मुलगा उत्तरला, त्यात काय? ज्याची ऑर्डर आधी दिली असेल ते आधी येईल.
##############
"प्रख्यात लेखक ऑस्कर वाइल्डने केलेली एक गंमतीदार व्याख्या.
निराशावादी- असा मनुष्य जो दोन वाईट गोष्टींमधून निवड करायची झाल्यास दोन्ही गोष्टी निवडतो."
##############
"एक दिवस एका एकांतात बंती बंताला प्रपोज करू लागते.
बंती : अरे माझ्या राजा.. माझी बेबी.. माझा लाडका.. माझा बाबू.. माझा बच्चू.
बंता : ए काय चाललंय हे?
बंती : अरे मी प्रेम करतेय तुझ्यावर.
बंता : प्रेम करतेयस, ही मला दत्तक घेतेयस?"
##############
तीन मित्र एका एका हॉटेलमध्ये ७५ व्या मजल्यावरच्या खोलीत राहात असतात. लिफ्ट बंद असल्याने जिन्याने चढणे कंटाळवाणे होऊ नये म्हणून ते ठरवतात की, पहिले २५ मजले चढेपर्यंत एकाने जोक्स सांगायचे. त्यापुढचे २५ मजले चढेपर्यंत दुसऱ्याने गाणी म्हणायची आणि त्यापुढचे २५ मजले चढेपर्यंत तिसऱ्याने वाईट बातम्या सांगायच्या. पहिल्याचे जोक ऐकत ते २५ मजले चढतात. दुसऱ्याची गाणी ऐकत पुढचे २५ मजले चढतात. ५१ व्या मजल्यावर आल्यावर तिसरा म्हणतो, पहिली वाईट बातमी ही आहे की मी खोलीच्या चाव्या गाडीत विसरलोय!
##############
"एक माणूस वर्तमानपत्रात जाहिरात देतो,
बायको पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्याला शंभर पत्रे येतात,
तुम्ही माझी घेऊ शकता!"
##############
फ्लोरिस्ट सव्हिर्सकडे पुष्पगुच्छासोबतच्या कार्डवर लिहिण्यासाठी काही खास संदेश अधिक लोकप्रिय असतात. थोडी अधिक रक्कम मोजल्यास एक खास संदेश बुकेबरोबर पाठवणाऱ्या फ्लोरिस्टचा सगळे जण शोध घेताहेत- आमच्या कंपनीकडे मनुष्यबळ कमी असल्याने आपला पुष्पगुच्छ पाठवायला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिर आहोत.
Post a Comment
Post a Comment